बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागतर्फे शिक्षण सप्ताहाचे यशस्वी आयोजन
मुंबई: बृहन्मुंबई महानगर पालिका (शिक्षण विभाग) द्वारे व्यवस्थापित व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर (व्हीटीसी) ही मुंबईतील एकमेव संस्था आहे जी गेल्या दहा वर्षांपासून बीएमसी शाळांना मराठी,हिंदी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतर्गत शिक्षण देत आहे.बीएमसीचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ साहेब आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) राजू तडवी यांचे मार्गदर्शन,विविध विषयांवर तज्ञांची विशेष व्याख्याने देखिल या केंद्रातून नियमितपणे आयोजित केली जातात.हीच पद्धती पुढे सुरू ठेवत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरने २२ जुलै ते २७ जुलै २०२४ या कालावधीत विभाग निरीक्षिका आरिफा सलीम शेख यांच्या देखरेखीखाली विविध उपक्रमांवर आधारित विशेष सत्रांचे आयोजन केले होते. सोमवार,२२ जुलै रोजी कठपुतळी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.शिवाजी नगर गोवंडी एमपीएस उर्दू क्र.४ शाळेतील गुणवंत कार्यानुभव शिक्षिका डैशिंग कर्तब्यदक्ष राजश्री नीरज बोहरा यांनी भारतातील लोक परंपरागत चालत आलेली कठपुतळी कशी बनवायची याचे अतिशय प्रभावी व यशस्वी मार्गदर्शन केले.मंगळवार २३ जुलै रोजी वामनराव महाडक म्युनिसिपल शाळा क्र.३ चे शिक्षक अब्दुल रज्जाक इक्बाल अहमद यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन केले. २४ जुलै रोजी क्रीडा दिनानिमित्त नीता अनिल जाधव यांनी आनंदाने विविध खेळांचे महत्त्व समजावून सांगितले व खेळाप्रकारांवर प्रकाश टाकला.२५ जुलै हा सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला.मनपा शाळेतील संगीत शिक्षक स्वाती मिलिंद,तृप्ती विलास आणि विनय चौगुले यांनी विविध गीतांचा समावेश असलेला उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला.२७ जुलै रोजी आभासी प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक अजय कुमार मौर्य, श्रीकुमार टी आणि डॉ.मैमुना शेख युनूस यांनी कौशल्य विकासात शाळेची भूमिका,पीपीटी बनवताना ॲनिमेशनचा वापर आणि डिजिटल पॅनेलची वैशिष्ट्ये तसेच विद्यार्थ्यांना शिकवताना पॅनेलचा वापर कसा करायचा याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले.बीएमसी मधील २०० पेक्षा अधिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या शिक्षण सप्ताहात आपला सहभाग नोंदवला. उपशिक्षणाधिकारी अजय वाणी,अधिक्षिका तनुजा आघाडे,विभाग निरीक्षका आरिफा सलीम शेख आणि व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या शिक्षकांची टीम व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरने दिलेले उत्कृष्ट अभ्यासक्रम, सह-अभ्यासक्रम व्याख्याने आणि कार्यशाळेसाठी अभिनंदनास पात्र आहेत.
वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती ही बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाची खासियत असून उपक्रमशील शिक्षण पद्धती ही सर्व समाज समावेशक आहे.त्यामुळेच आज शैक्षिणक गुणवत्ता वृध्दींगत होऊन सर्वगुण संपन्न विद्यार्थ्यांची वाढती गणसंख्या हे बृ.मुं.म.न.पा चे वैशिष्ट्य आहे.
Comments