सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका राजश्री बोहरा आयकॉन ऑफ द नेशन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
मुंबई-
महाराष्ट्राची लाडकी कन्या,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या,सुप्रसिद्ध मराठी साहित्यिका सन्माननीय राजश्री नीरज बोहरा यांना रेडीयंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या ख्यातनाम राष्ट्रीय संस्थेद्वारा आयकॉन ऑफ द नेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात १४ जुलै २०२४ रोजी आयोजित नॅशनल एक्सलन्स कॉन्फरन्स मध्ये भारतातील विविध प्रंतमधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध लेखक डॉ.क्रांतिकुमार महाजन यांनी केले होते.या कार्यक्रमास पद्मश्री सन्मा.विजयकुमार शाह,जम्मू राज्याच्या राजघराण्यातील राणी सन्मा.डॉ सुहासिनी मदने,सीआयडी ऑफिसर सन्मा.आरिफा मुल्ला, तंजावर घराण्याचे वारसदार लखोजी जाधव यांचे थेट वंशज शिवाजीराव जाधव व अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.राजश्री बोहरा या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत.गेली १० वर्षे मराठी साहित्यक्षेत्रात त्यांचे कार्य सुरू आहे.त्यांनी आत्तापर्यंत दर्जेदार १४ राज्यस्तरीय साहित्य संमेलने ठाणे आणि मुंबई विभागातून आयोजित केली आहेत.तसेच आत्तापर्यंत त्यांनी १२ वेळा विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे.त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी ५००० पेक्षा जास्त दैनिक साहित्यिक उपक्रम राबविले आहेत. १०० पेक्षा आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, आणि राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेतल्या आहेत.कोविड लॉकडाउनच्या काळात त्यांनी मराठी साहित्य सृष्टीत अनेकविध ऑनलाईन उपक्रम राबवून अनेकांना “जगण्यासाठी साहित्य” ही नवी दिशा दाखवली आहे.फेसबुक लाईव्ह सादरीकरण, वीडियो सादरीकरण,व्हॉट्सऍप समूहातून डिजिटल सन्मानपत्र वितरण,दैनिक विविध विषय देऊन लेखन,काव्यलेखनाच्या तसेच गझल लेखनाच्या कार्यशाळा असे नाना विविध उपक्रम सुरू केले. मराठी साहित्याची आवड घराघरांतून निर्माण केली. अगदी 2-3 वर्षाच्या लहान मुलांपासून ते ८७ वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत हजारोच्या संख्येने मराठी प्रेमींना एकत्र एकच व्यासपीठावर आणले. त्यामुळेच त्या काळात मोठ्या प्रमाणात नव कवींची निर्मिती झाली.त्यांना व्यक्त होण्यासाठी राष्ट्रीय पातळीचे व्यासपीठ मिळवून दिले.त्यापैकी अनेक जणांचे साहित्य आज काव्यसंग्रहाच्या रूपातून मराठी साहित्य जगतात रुजू झाले आहे.एवढ्या मोठ्या आणि भव्य स्वरूपात साहित्यिक उपक्रम राबविणाऱ्या त्या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिल्या महिला आहेत.त्यांचे स्वतःचे दोन काव्य संग्रह आत्मफुले आणि राजकाव्य हे प्रकाशित झाले असून या वर्षभरात त्यांचे पुढील 3 काव्यसंग्रह सदाफुली,स्मिताई,आभाळाचे काळीज हे प्रकाशित होण्याच्या प्रक्रियेत आहेत.त्यांनी आत्तापर्यंत 4 बालनाट्य,3 पथनाट्य लिहिले आहेत.अनेक दिवाळी अंकातून,मासिकातून,प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून व वृत्तपत्रातून त्यांच्या अनेक कविता,आणि लघु लेख प्रकाशित होत असतात.
त्या डॉक्टर इन नाच्युरोपथी असून,भारतीय वस्तूतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यांनी अनेक विविध प्रकारचे शिक्षण आजवर घेतले आहे.पैकी त्या रेकी मास्टर,हीलिंग मास्टर,रत्न शास्त्र पंडित,अंक शास्त्र विशारद,अरोमा थेरेपी एक्स्पर्ट आहेत.त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून गेली 18 वर्षे कार्यरत आहेत.उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.आजपर्यंत त्यांना आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय आणि राज्य असे मिळून एकूण ६० पुरस्कार मिळाले आहे.या सन्मानाबद्दल साहित्य क्षेत्रातून,सामाजिक क्षेत्रातून तसेच शैक्षणिक क्षेत्रातून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments